Marathi question paper On Sholay

रामगढ के शोले

' शोले' चित्रपट हा हिंदी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड आहे . भारतीय जनामानसावर या चित्रपटाचा असलेला पगडा लक्षात घेऊन यंदा दहावीच्या अभ्यासक्रमात ' शोले ' हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. याचा एक फायदा म्हणजे ' शोले' सर्वांनी इतक्या वेळा पाहीला आहे की पाठ्यपुस्तकाची गरजच नाही. आणि परीक्षेच्या काळात भाड्याने CD उपलब्ध करून दिल्या जातील अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे . तेव्हा आता काम उरले एकच. प्रश्नपत्रिका काढणे . आणि मंडळाने सर्वानुमते ' शोले ' चित्रपटाचे जाणते अभ्यासक श्री श्री अभिजित यादव यांच्याकडे सोपवले आहे . तर अशी असेल प्रश्नपत्रिका.........

-------------------------------------------------------------------------------
सूचना : १ . एकूण ८ प्रश्न असतील. ( आदमी १ और प्रश्न ८!!)
२ . सर्व प्रश्न सोडवणाऱ्याला पचास हजार इनाम दिले जाईल.

प्रश्न १ : खालीलपैकी एका विषयावर ४ पाने निबंध लिहा ....( १५ हजार )

* धन्नोची स्वामीनीनिष्ठा
* खरा नायक कोण : जय की विरू?
* मी गब्बर असतो तर ?
* रामगढचे निसर्गसौंदर्य

प्रश्न २ : खालीलपैकी २ प्रश्नांची उत्तरे २ ते ३ पाने लिहा......( १० हजार )

* ठाकूर बल्देव सिंग आणि डाकू गब्बर सिंग यांच्यातील दुश्मनीची कारणे सांगा . तसेच ठाकूरने गब्बरला पकडण्यासाठी जय आणि विरू यांचीच निवड का केली ?
* गब्बरने रामगढच्या वासीयांवर केलेले अत्याचार तुमच्या शब्दांत सांगा .
* जयने विरूसाठी केलेला त्याग उदा: दोन्ही बाजूला समान छाप असलेल्या नाण्याचा वापर आणि जय- विरूची दोस्ती यावर चित्रपटाएवढे प्रदीर्घ उत्तर लिहा .
* विरू आणि बसंतीची प्रेमकहाणी .

प्रश्न ३ : टीपा लिहा . शब्दमर्यादा - रेल्वे स्थानकापासून ते रामगढपर्यंत बसंतीने जितक्यावेळा "यूं तो हमे फ़िजूल बात करने की आदत नही " म्हटले आहे तितकी.....................................................( ८ हजार )

* सूरमा भोपाली आणि जेलर यांचे विनोद .
* विरूचे मद्यप्राशन करून जलकुंभारोहण .
* रामलाल: एक आदर्श निष्ठावंत .
* होळी उत्सवातील नाट्यमय घडामोडी .

प्रश्न ४ : एका वाक्यात उत्तरे द्या .................................( २ हजार )

* जय नेहमी कोणते वाद्य वाजवत असे ?
* बसंती चांगला नवरा मिळावा म्हणून कोणत्या देवाची प्रार्थना करत असे?
* जय- विरूला पकडून देण्यासाठी सरकारने किती इनाम लावले होते ?
* अहमद- इमामचा मुलगा नोकरीसाठी कोणत्या गावी जात असतो ? (ही हा हा कसं वाटतंय पेपर सोडवताना )

प्रश्न ५: गाळलेल्या जागा भरा . ....................................(६ हजार)

* ये हात मुझे दे दे................. . ( टीप: नीट विचार करा. हात देण्याआधी नव्हे. उत्तर लिहिण्याआधी)
* तुम्हारा नाम क्या है ......................?
* तेरा क्या होगा ,....................?
* अरे ओ ........... कितना इनाम रखे है रे सर्कार हमपे ?

प्रश्न ६ : कोण कोणास म्हणाले ते लिहा. .........................( ३ हजार )

* इतना सन्नाटा क्यूं है भाई?
* लोहा गरम है मार दो हथोडा।
* यूं तो १० -२० को तो हम भारी पड ही सकते है।
* सूंअर के बच्चो।
* हमारी जेल मे सुरंग ???
* पहली बार सुना है ये नाम।

प्रश्न ७: खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर द्या. ..............( ४ हजार )

* गब्बरला पकडण्यासाठी वर्तमानपत्रामध्ये जाहीरात द्यायची आहे. त्याचा मसुदा तयार करा. ( शब्दमर्यादा : इनामाची

SOUTH INDIAN MOVIE SCENES (GOOD ONE)

video
video
video
video

Amaizing Graffiti













Funny Cricket Images